आमच्या ग्रामपंचायतीबद्दल
ग्रामपंचायत दिवड ही आपल्या गावाच्या विकास, नियोजन आणि कल्याणासाठी जबाबदार असलेली स्थानिक प्रशासकीय संस्था आहे. पंचायती राज कायद्यांतर्गत स्थापन झालेली आमची ग्रामपंचायत सरकारी योजना राबविण्यात, मूलभूत सुविधा राखण्यात आणि सर्व नागरिकांसाठी पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
ग्रामपंचायत दिवड ही आपल्या गावाच्या विकास, नियोजन आणि कल्याणासाठी जबाबदार असलेली स्थानिक प्रशासकीय संस्था आहे. पंचायती राज कायद्यांतर्गत स्थापन झालेली आमची ग्रामपंचायत सरकारी योजना राबविण्यात, मूलभूत सुविधा राखण्यात आणि सर्व नागरिकांसाठी पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
आमचे कार्यक्षेत्र
पाणीपुरवठा आणि स्वच्छता
स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारणे.
ग्रामीण रस्ते विकास
अंतर्गत गावातील रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल.
पर्यावरणीय प्रकल्प
वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमा.
आरोग्य आणि स्वच्छता
वैद्यकीय शिबिरे आणि आरोग्य तपासणीचे आयोजन.
शिक्षण आणि जागरूकता
साक्षरता आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
आमचा संघ
सौ. अर्चना सावंत
सरपंच
श्री. शिवाजी सावंत
उपसरपंच
श्री. तानाजी गंबरे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत - दिवड
तालुका : माण | जिल्हा : सातारा
सरपंच निवडणूक दिनांक : 2022 | कार्यकाळ समाप्त : 2027
| क्र. | नाव | पद | संपर्क क्रमांक |
|---|---|---|---|
| 1 | सौ. अर्चना संजयकुमार सावंत | सरपंच | +91-9970028867 |
| 2 | श्री. शिवाजी वसंत सावंत | उपसरपंच | +91-7020501737 |
| 3 | श्री. नवनाथ बापुराव लोखंडे | सदस्य | +91-9975112944 |
| 4 | सौ. कुसुम अरविंद सावंत | सदस्य | +91-7888287617 |
| 5 | श्री. सतिश पांडुरंग घुटुकडे | सदस्य | +91-9503237672 |
| 6 | सौ. संध्या सुनिल भोसले | सदस्य | +91-7719017516 |
| 7 | सौ. प्रियांका विनायक लोखंडे | सदस्य | +91-7709056934 |
| 8 | श्री. जयवंत पांडुरंग सावंत | सदस्य | +91-9850455528 |
| 9 | सौ. सावित्रा रामचंद्र सावंत | सदस्य | +91-7977508792 |
| 10 | सौ. संतोषी शिवाजी काटकर | सदस्य | +91-9623838433 |
| क्र. | कर्मचारी नाव | पद | संपर्क क्रमांक |
|---|---|---|---|
| 1 | श्री. तानाजी लक्ष्मण गंबरे | ग्रामपंचायत अधिकारी | +91-9422007485 |
| 2 | श्री. अमोल निवृत्ती पारसे | संगणक परिचालक | +91-9404160089 |
| 3 | श्री. विश्वनाथ देवबा नामदास | पाणी पुरवठा कर्मचारी | +91-9623937317 |
| 4 | श्री. राजेंद्र शशिकांत जाधव | ग्रामरोजगार सहाय्यक | +91-9921199980 |
| 5 | श्री. सोपान ज्ञानू लोखंडे | शिपाई | +91-9767319379 |
आमचा दृष्टिकोन
एक स्वच्छ, विकसित आणि स्वयंपूर्ण गाव बांधणे जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाने आणि संधीने जगेल.
आमचे ध्येय
- पाणी, स्वच्छता आणि रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा पुरवणे.
- गावात शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यांना प्रोत्साहन देणे.
- बचत गट आणि कौशल्य कार्यक्रमांद्वारे महिला आणि तरुणांना सक्षम बनवणे.
- गावाच्या विकासात पारदर्शकता आणि सहभाग सुनिश्चित करणे.
- पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे.
गावचे वैशिष्ट
दिवड गाव हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या व शुरविरांचा जिल्हा सातारा मधून माण तालुक्यातून सातारा पंढररपूर व विटा मायणी रोड लगत असलेले 2755 एवढी लोकसंख्या असलेले गाव या गावामध्ये एकून 1355 महिला संख्या आहे दिवड गाव हे पुर्णपणे शेतीपुरक गाव असून याठिकाणी प्रामुख्याने, मका, ज्वारी, बाजरी, ऊस हि पिके घेतली जातात. परंतु व्यावसायिक दृष्टीकोणातून अधिक उत्पादन वाढवून हे गाव आता सेंद्रिय शेती व रेशीम तुती शेतीकडे वळले आहे दिवड गाव हे फौजीचे गाव म्हणूनही ओळखले जाते. या गावचे ग्रामदैवत हे म्हसोबाराया असून गावामध्ये मोठे मंदिर आहे. म्हसोबारायाच्या कृपेने व ग्रामस्थांच्या मदतीने हे गाव आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे.
जिल्हा परिषद शाळा
१ ते ४ थी पर्यंत असूनु ही पूर्ण डिजीटल शाळा आहे. हि शाळा 2023 ला जिल्हातून स्वच्छ शाळा व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून पहिल्या क्रमांकावर आली. हि शाळा पूर्णपणे भौतिक सुविधायुक्त शाळा आहे. यामध्ये मध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान, मैदानात वृक्षारोपन, गार्डन, ओपन जिम, प्रत्येक वर्गात व शाळेच्या आवारात मुलांच्या संरक्षणासाठी CTV कैमेरे, विजप्रक्रियेसाठी सोलर मुला – मुलीसाठी विभक्त शौचालय व पिण्यासाठी शुद्ध व वॉटर फिल्टर चिलर पाणी व पोषक आहारासाठी सेंद्रिय परसबाग व स्वयंपाकगृह शाळेतील शिक्षण पद्धती हि आधुनिक असून यासाठी मुलांना लॅपटॉप, कॉप्युटर प्रोजेक्टर वरती शिक्षण दिले जाते शिक्षणाव्यतीरिक्त मुलांची आवड लक्षात घेवून मुलांना वारली पेंटींग, सुडोकू , बुध्दीबळ, कागदी पिशवी, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे पेपरलेस बँकिंग बचत, किल्ला बनविणे, चप्पल स्टैंड बनविणे अशा विविध कला शिकविण्यात आल्या.
श्रमदान
गावामध्ये आठवड्यातून एकदा श्रमदान केले जाते यामध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, वनराई बंधारा, पाणंद रस्ते दुरुस्ती, वृक्षारोपन हि कामे श्रमदानातून केली जातात यामध्ये गावातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो.
लघुउद्योग कृषी सहल
महिलांना लहुउद्योग करता यावा यासाठी त्यांना कृषि व व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये शेळीपालन कुकुटपालन, मधमाशी पालन, गांडूळ खत निर्मिती व लागवड शेतीतील आधुनिक पद्धत फळझाड लागवड इत्यादी समावेश होता
या प्रशिक्षणामुळे तसेच ग्रामपंचायत व उमेदच्या माध्यमातून आज गावातील 300 महिला स्वतः चा लघुउद्योग करून स्वताच्या पायावर उभ्या आहेत. घरोघरी दुग्ध व्यवसाय करण्यात महिला अग्रेसर आहेत
आरोग्य तपासणी
गावामध्ये प्रत्येक ३ महिन्यानंतर आरोग्य तपासनी करण्यात येते. यामध्ये हिमोग्लोबीन तपासणी, ब्लड प्रेशर, रक्तातील साखर, नेत्र तपासणी, ECG, स्तन कॅन्सर तपासणी व गर्बाशयाद्वारे होणारे विविध आजार यावरील तपासनी गोदर माता तपासणी अशा सर्व गर्भाशयाद्वारे होणारे विविध आजार या प्रकारच्या तपासण्या करून त्यांना उपकेंद्र दिवड द्वारे उपचार दिले जातात.
महिला सहभाग
ग्रामपंचायतीशी महिला जोडल्याजाण्यासाठी महिला सभा, बालसभा किशोरवयीन मुली यांची सभा घेऊन महिलांचे प्रश्न जाणून घेतले व ग्रामपंचायतच्या माध्यमातून महिलांचे व मुलीचे प्रश्न मार्गी लावले यामध्ये महिलांना घरकुल, संजयगांधी निराधार, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांचा लाभ मिळवून दिला. मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन मशिन बसविण्यात आली महिला व मुली यांच्या सुरक्षिततेसाठी गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले.
किशोरवयीन मुली
किशोरवयीन मुलीची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य उपचार देण्यात आला. गावातील इंदिरा गांधी विद्यालय याठिकाणी मुलीसाठी पिंक रूम ची व्यवस्था केली सॅनिटरी पॅड मशिन व डिस्पोजेबल मशिन बसविण्यात आली मासिक पाळीमध्ये आराम करण्यासाठी हॉस्पिटलईज खॉट व मेडीसिन सुविधा उपलब्ध करण्यात आली.
ॲनिमिया मुक्त गाव
या संकल्पनेअंतर्गत गावातील सर्व महिला व किशोरवयीन मुली यांची हिमोग्लोबीन तपासनी करण्यात आली ज्या महिला व मुली ॲनिमिया आढळल्या त्यांना Iron & folic अॅसिडच्या च्या गोळ्या देणेत आल्या पोषक आहारासाठी घरोघरी सेंद्रिय पोषण परसबाग निर्मिती करून त्याचा आहारात समावेश केला. महिलांना व मुलींना पोषण आहार, मायक्रोग्रीन, सेंद्रिय परसबाग याविषयी प्रशिक्षणे देण्यात आली.
विधवा सन्मान
गावातील विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी जुन्या रुढी, परंपरा मोडित काढल्या महिलांना सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी करुण घेतले. आज त्या आपल्या घराची जबाबदारी घेऊन खंबरिपणे व सन्मानाने समाजात वावरत आहेत.
गट शेती
गावामध्ये याद्वारे शेती केली जाते त्यामुळे महिला व पुरुष यांचे शेती गट स्थापन करण्यात आले. हि शेती सेंद्रिय पध्दतीने केली जाते. रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खत सेंद्रिय खत व औषध फवारणी करून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून आज महिलांचा गट पाणी फौडेशन च्या माध्यमातून फार्मर कप साठी काम करत आहे.
गावातील सुविधा
गावातील महिलांना सर्व सुविधा असल्याने बाहेरगावी जावे लागत नाही यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सोसायटी पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, पाण्यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल योजना प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन, वॉटर एटीएम सुविधा, रेशन वितरण दुकान, सार्वजनिक महिला शौचालय या सर्व सुविधा पोचवण्यात आल्या.
रेशिम व्यवसाय
गावामधून एकुण 11 कुटुंब हा व्यवसाय करत आहेत या कुटुंबातील महिला हा व्यवसाय करून उद्योगी बनल्या आहेत यासाठी सेंद्रिय तुती लागवड व रेशीम कोष निर्मिती व कोष वितरण व्यवसाय करत आहेत या माध्यमातून गावातील इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
पारंपारिक सन
गावात ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पारंपारिक सणांचे आयोजन केले जाते. परपरागत असलेले आपले सण है आधुनिक युगात लुप्त होत चालले असताना महिलांना व मुलींना सणांविषयी आपुलकी, माहिती व आनंद मिळावा यासाठी है, सण नव्याने चालू करण्यात आले यामध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रम रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, इत्यादी स्पर्धांचे चे आयोजन करून विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांचा गावातील कार्यक्रमामध्ये सहभाग वाढला. गावातील महिला व मुली सक्षम बनल्या.
ग्रामपंचायत दिवड
गावच्या सरपंच या लोकनियुक्त सरपंच आहेत. ग्रामपंचायत बॉडी ही 9 ची आहे. सरपंच अर्चना संजयकुमार सावंत या महिला असल्याने व ग्रामपंचायत बॉडीमध्ये महिला सदस्य संख्या जास्त असल्याने गावातील महिला स्नेही वातावरण निर्माण झाले ग्रामपंचायत दिवड ही गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबध्द आहे
विधवाप्रथा बंदी
गावांमध्ये परंपरागत आलेल्या रूढी परंपरा व प्रथा मोडीत काढून गावातील ज्या महिलांचे प्रति मृत्यू झाले आहेत अशा महिलांना हळदी कुंकवाचा मान दिला व शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला.
पिंक रूम
किशोरवयीन मुलींसाठी पिंक रूम बनविण्यात आली यामध्ये महिला व मुली यांच्यासाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था करण्यात आली गावात उपकेंद्र या ठिकाणी महिलांसाठी सॅनिटरी मशीन उपलब्ध करून दिली.
महिला आर्थिक सक्षमीकरण
- गावातील स्वयं-सहाय्यता बचत गटांना (SHG) बळकटी देऊन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन शिवणकाम, अगरबत्ती, पापड, मसाले प्रक्रिया, डेअरी व्यवसाय यांसारख्या लघुउद्योगांचे प्रशिक्षण.
- बँक कर्ज व शासकीय योजनांशी जोडणी करून आर्थिक स्वावलंबनाला चालना
- आरोग्य व पोषण उपक्रम
- नियमित महिला आरोग्य तपासणी शिबिरे
- गर्भवती माता व किशोरवयीन मुलींसाठी विशेष पोषण जनजागृती
- स्वच्छता, मासिक पाळी आरोग्य व सॅनिटरी पॅड वितरण मोहीम
- शिक्षण व डिजिटल साक्षरता
- मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रोत्साहन व शालेय साहित्य वाटप
- महिलांसाठी डिजिटल साक्षरता वर्ग (ऑनलाईन व्यवहार, मोबाईल बँकिंग, शासकीय सेवा अर्ज प्रक्रिया)
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे
- शासन सहभाग व नेतृत्व
- ग्रामसभेत महिलांची उपस्थिती व सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी स्वतंत्र महिला ग्रामसभा
- महिलांसाठी तक्रार निवारण कक्ष व कायदेविषयक मार्गदर्शन
- ग्रामपंचायत निर्णय प्रक्रियेत महिलांचा थेट सहभाग
- सामाजिक व पर्यावरण उपक्रम
- महिला बचत गटांमार्फत स्वच्छता अभियान
- प्लास्टिक मुक्त गाव मोहिमेत महिलांचे नेतृत्व
- वृक्षारोपण व पाणी बचत जनजागृती
- सौ. अर्चना सावंत यांच्या दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दिवड गाव महिला स्नेही व सशक्त गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे
दिवड 1 ते 17 मुद्दे माहिती
No Information PDF uploaded yet.
